सोलापूर विधान परिषदेत राजकीय समीकरणांना वेग; आमदार नारायण पाटील यांचा राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा
प्रतिनिधी – पंढरपूर
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीच्या राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आयोजित बैठकीत आमदार नारायण पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीला राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या घोषणेमुळे या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीला विविध स्तरांवरून मिळत असलेला पाठिंबा हा त्यांच्या कार्यपद्धतीवरील विश्वासाचे प्रतीक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी असलेला संपर्क आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे त्यांच्या उमेदवारीला बळ मिळत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.या घडामोडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली असून आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. :::
More Stories
मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा १० हजारांपर्यंत नेत्रशस्त्रक्रिया : प्रणव परिचारक
पंढरपुरात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक
वाढदिवसा दिनीही विकासकामांनाच प्राधान्य; पंढरीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरा