सोलापूर – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक – २०२६ साठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष ‘नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ रोजीचे पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना लेखी सुचना देऊन कळविण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावावा. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना मतदानासाठी मतदानासाठी नैमित्तिक रजा मंजुर करणेत यावी.
भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या कार्यक्रमानुसार विधान परिषद निवडणुक 2026 पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी सकाळी ०८.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोलापूर जिल्हयातील आपल्या अधिनस्त प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक संलग्न सर्व व्यवस्थापना मध्ये कार्यरत असलेल्या व संबंधित मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदविलेल्या पात्र शिक्षक व कर्मचा- यांना मतदानासाठी आवश्यक ती सवलत देणे गरजेचे आहे.
त्यानुसार, संबंधित निवडणूकीत मतदानास पात्र असलेल्या शिक्षक व कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नियमानुसार विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. मतदानाच्या दिवशी संबंधित पात्र मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येईल, याची दक्षता घ्यावी.
सदर रजेची नोंद संबंधित शाळेच्या अभिलेखात नियमानुसार घेण्यात यावी. या सूचनांची आपल्या अधिनस्त सर्व शिक्षक व कर्मचा-यांना माहिती देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. या बाबीस प्राधान्य देऊन आवश्यक ती कार्यवाही करणेचे सुचना शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केल्या आहेत.
More Stories
कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू! महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार पिंपरी-चिंचवड–भोसरीतील पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा उत्साहात संपन्न; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मार्गदर्शन
सोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!
पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे