October 30, 2026

ppr

लेखनदिवाळीत भीमा कारखान्याची सभासदांना गोड भेट! २० किलो साखर सवलतीत, ५ किलो मोफत; कामगारांनाही १० किलो मोफत

टाकळी सिकंदर |

प्रतिनिधीदिवाळीचा सण म्हटलं की गोडवा आणि आनंदाची पर्वणी! याच आनंदात भर घालण्यासाठी भीमा सहकारी साखर कारखाना लि., टाकळी सिकंदरच्या वतीने सभासद आणि कामगारांसाठी विशेष साखर वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्याच्या या निर्णयामुळे सभासदांची दिवाळी अधिक गोड होणार आहे.खासदार धनंजय भिमराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या निर्णयानुसार, कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला ३० रुपये प्रतिकिलो दराने २० किलो साखर आणि त्यासोबत ५ किलो साखर मोफत, अशी एकूण २५ किलो साखर मिळणार आहे. तर कारखान्यातील कामगारांनाही दिवाळीनिमित्त १० किलो साखर मोफत देण्यात येणार आहे.सभासदांसाठी साखर वाटपाचे नियोजन २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संबंधित गट कार्यालयांवर करण्यात आले आहे. तर कामगारांना ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर साखरेचे वाटप केले जाणार आहे.सभासद आणि कामगार हे कारखान्याच्या प्रगतीचे महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका व्यवस्थापनाने घेतली आहे. दिवाळीच्या सणात सभासदांच्या कुटुंबासह कामगारांच्या आनंदात भर घालण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक म्हणाले की, भीमा सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. यंदाही शेतकरी सभासदांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी २० किलो साखर सवलतीच्या दरात आणि ५ किलो साखर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कामगारांनाही १० किलो साखर मोफत देण्यात येणार असून, सर्वांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.एकूणच, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भीमा सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या या निर्णयामुळे सभासद आणि कामगारांना साखरेच्या रूपाने गोड भेट मिळणार आहे.

You may have missed