पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी व ११३ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेली, तसेच महाराष्ट्र राज्यात कार्यविस्तार असलेली दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पंढरपूर हिला प्रतिष्ठेचा “नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५” (विशेष उल्लेखनीय कामगिरी) प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. बँकेस हा मानाचा पुरस्कार मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
बँकेच्या वतीने चेअरमन श्री. सतीश मुळे, संचालक श्री. हरीश ताठे, श्री. मनोज सूरवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उमेश विरधे, व व्यवस्थापक श्री. गणेश हरिदास, विशाल तपकिरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नवराष्ट्र समूह दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करतो. यावर्षीच्या या सन्मानासाठी दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँकची निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी बँकेचे चेअरमन श्री. सतीश मुळे म्हणाले : “आमचे दैवत श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांनी दाखवून दिलेल्या संस्कारित सहकाराच्या मार्गावर आम्ही प्रामाणिकपणे वाटचाल करत आहोत. कुटुंबप्रमुख मा. प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, अधिकारी आणि सेवकवर्ग बँकेच्या प्रगतीसाठी एकदिलाने कार्यरत आहे. ग्राहकांचा विश्वास आणि सभासदांचे सहकार्य हेच आमच्या यशाचे खरे बळ आहे. हा पुरस्कार आमच्या सर्व ग्राहक, सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांना समर्पित आहे.”
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उमेश विरधे यांनी सांगितले : “सहकार क्षेत्रातील आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘नवराष्ट्र’ समूहाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”
या दिमाखदार सोहळ्याला मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील (सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. ना. श्री. संजय सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य), आमदार प्रवीण दरेकर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार फेडरेशन), आमदार विनय कोरे (अध्यक्ष, वारणा समूह), आमदार प्रसाद लाड, तसेच श्री. प्रविण दराडे (मुख्य सचिव, वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य) आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
सिल्व्हरओक शाळेचे मोहोळ तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…..
पंढरपूर- माढा मतदारसंघाचे आ.अभिजीत पाटील आंदोलन स्थळी दाखल, निवेदन स्वीकारले येत्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवणार