September 26, 2026

ppr

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या बार्शी येथे झाली बैठकी


डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या बार्शी शाखेची कार्यकारिणी पदग्रहण बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सूर्यकांत वायकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कार्यकारणी सदस्य दादा सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख धीरज शेळके, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा सहसचिव किरण माने, जिल्हा संघटक तानाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष नीता देव, महिला जिल्हा उपाध्यक्ष राजश्री गवळी, आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत, उपाध्यक्ष अक्षय बारंगुळे, बार्शी तालुका ग्रामीण उपाध्यक्ष भैरवनाथ चौधरी, सचिव शंकर लाखे, खजिनदार विश्वास वीर, संपर्कप्रमुख श्रीशैल माळी, बार्शी तालुका महिला अध्यक्ष प्रतिज्ञा वाळके, तर अभिजीत शिंदे, परशुराम राऊत, रवींद्र सांगोळे, स्वप्निल पोकळे, किशोर शेटे कार्यकारी सदस्य अशा निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे यांनी मनोगत व्यक्त केले.
संघटनेचे राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करताना घ्यायची काळजी आणि येणाऱ्या अडचणी या विषयावर मार्गदर्शन केले. व उपस्थित पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले.
या बैठकीत पुढील प्रमाणे ठराव मांडून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
१) दिनांक 4 फेब्रुवारी रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त बार्शी नगरपरिषदेसमोर विद्यार्थ्यांना 500 लिटर सुगंधी मसाला दूध वाटप करणे.
सूचक – सिद्धार्थ बसवंत अनुमोदक – अक्षय बारंगुळे
२) डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सर्वेसर्वा राजा माने यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घ्यावे यासाठी सर्व संघटना प्रतिनिधी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा आणि मागणी करावी
सूचक – धीरज शेळके, अनुमोद – मुरलीधर चव्हाण
३) दिनांक 19 मार्च रोजी संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात भव्यदिव्य स्वरूपात साजरा करणे
सूचक – धीरज शेळके, अनुमोदक – शंकर लाखे
४) वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सात व्यक्ती किंवा संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करणे
सूचक – भैरवनाथ चौधरी अनुमोदक – श्रीशैल माळी
५) जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप करणे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे
सूचक – नीता देव, अनुमोदक – अभिजीत शिंदे
वरील सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
बैठकीला बार्शी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.

You may have missed