October 14, 2025

ppr

माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Spread the love


कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आवारात, माजी आमदार कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण तसेच
१० हजार मे.टन विस्तारीकरण गाळप व पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्य सहकार परिषद अध्यक्ष राजन पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाषबापु देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार दिलीप सोपल, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार नारायण पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार राजु खरे, आमदार आभिजीत पाटील, माजी खासदार जयसिध्देश्वर स्वामी, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीपराव माने, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार डॉ.राम साळे, माजी आमदार रामहरि रुपनवर, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार शामलताई बागल, माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार शहाजीवापू पाटील, माजी आमदार धनाजी साठे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार दत्तात्रय सावंत, साखर आयुक्त डॉ.संजय कोलते, आयुक्त दिपक तावरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे राजकारणातील संततुल्य व्यक्तिमत्व मानले जाते. सुमारे 25 वर्ष पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व त्यांनी केले. पंढरपूरच्या राजकीय, शैक्षणिक, सहकार या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. राजकीय क्षेत्रात म्हणूनच त्यांच्या नावाचा दबदबा होता. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी आणि विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना कृतिशील आणि सत्वशील राजकारणाची प्रेरणा देत राहील त्यामुळे या पुतळा अनावरण तसेच कारखाना विस्तारीकरण शुभारंभ कार्यक्रमाला परिसरातील पांडुरंग परिवाराची पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे. कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी व व्हाईस चेअरमन कैलास खुळे, सर्व संचालक मंडळ कर्मचारी वृंद हे कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.