November 2, 2026

ppr

प्रभाग १७ मधील नागरिकांची दिवाळी गोडमनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून दिवाळी किटचे वाटप

पंढरपूर / प्रतिनिधी

सण-उत्सवाच्या आनंदात कोणताही अडथळा येऊ नये आणि श्रीमंतांप्रमाणे गोरगरीब नागरिकांनाही आनंदाने दिवाळी साजरी करता यावी, या सामाजिक भावनेतून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील सर्व नागरिकांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रभागातील नागरिकांची दिवाळी अधिक गोड होणार असून धोत्रे यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.या दिवाळी किटमध्ये साखर, रवा, मैदा, गोडेतेल, डालडा, चकली पीठ, मोती साबण, उटणे, सुगंधी तेल, मीठ, खोबरे, डाळे, चुरमुरे, पोहे, शेंगदाणे तसेच फटाके आदी दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा समावेश करण्यात आला होता.तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष अभिराज उबाळे यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका माधुरीताई धोत्रे, नगरसेवक लोकेश यादव, मनसेचे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, पिंटू गायकवाड, दादा घोडके, दिनेश पांढरे, दादा क्षीरसागर, जगदीश लकेरी, बापू खिलारे, संतोष सर्वगोड, नाथा यादव, प्रसाद यादव, लाला पेंटर, शफी मुलाणी, जमीर सय्यद, विवेक शिंदे, बाळू देवमारे, भोला साठे, राजू वाघमारे, नागेश इंगोले, भावड्या माने, धनाजी सुरवशे, दत्ता कटके, सोमा काटे, पप्पू बनपट्टे, आपाल्या गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की, सध्या दुष्काळी परिस्थिती असताना नागरिकांवर रिन काढून सण साजरा करण्याची वेळ येऊ नये. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही कुटुंबाचा दिवाळीचा आनंद हिरावला जाऊ नये. गोरगरीब नागरिकांनाही श्रीमंतांप्रमाणे दिवाळी साजरी करता यावी, या उद्देशाने प्रभागातील नागरिकांना दिवाळीसाठी लागणारे सर्व किराणामाल साहित्य भेट देण्यात आले आहे.