July 17, 2026

ppr

पत्रकारांच्या मुलांच्या करिअरसाठी लाखो रुपयांची मदत; बार्शीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार


बार्शी प्रतिनिधी :
पत्रकारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान देणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा बार्शी येथे पत्रकार बांधवांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच आरोग्यविषयक गरजांसाठी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल हा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात पत्रकारांनी ग्रामदैवत भगवंताची मूर्ती भेट देत दादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकारांच्या अडचणी ओळखून त्यांना मदतीचा हात देणारे नेतृत्व म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांची ओळख अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती चे संचालक तथा ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना च्या कार्याची दखल घेत मंत्री पाटील यांनी पत्रकारांसाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत राज्यभरातील पत्रकारांना तब्बल १७ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
ही मदत पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी देण्यात आली आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल प्रेरणादायी असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या सत्कार सोहळ्यास बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्षा निता देव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बसवंत तसेच संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed