पटवर्धनकुरोली या गावासाठी स्वतंत्र कृषी सहाय्यक मिळावा…
पटवर्धनकुरोली:-पटवर्धन कुरोली हे महसूल मंडळाचे मुख्यालय असून या गावची लोकसंख्या सहा ते सात हजार असून सदर गावासाठी आज रोजी स्वतंत्र कृषी सहाय्यक पद नाही सध्या या ठिकाणी अतिरिक्त कृषी सहाय्यक पदाचा पदभार आहे सदर कृषी सहाय्यक यांच्याकडे अगोदरच तीन ते चार गावाचा पदभार असून त्यांना पटवर्धन कुरोली या गावासाठी पूर्ण वेळ देता येत नाही यामुळे अनेक शेतकऱ्यांची फळबाग लागवड अनुदान, रोजगार हमी,पीक विमा, कृषी पीक पाणी सल्ला गैरसोय होत आहे नदीकाठी गाव असल्याने फळबागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे तरी आमच्या गावासाठी स्वतंत्र कृषी सहाय्यक यांची नेमणूक करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल…
यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी पंढरपूर सौ.दिपाली जाधव मॅडम, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशउपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, रमेश पवार, रणजीत उपासे, राहुल नाईकनवरे शेतकरी उपस्थित होते…
More Stories
मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा १० हजारांपर्यंत नेत्रशस्त्रक्रिया : प्रणव परिचारक
पंढरपुरात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक
वाढदिवसा दिनीही विकासकामांनाच प्राधान्य; पंढरीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरा