पंढरपूर | प्रतिनिधी
पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी लिंक रोडवरील हॉटेल स्वराद्या येथे उत्साहात पार पडला. यावेळी पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीला पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष दिलीप आबा पाटील, राज्य प्रसिद्धीप्रमुख तोफिक शेख, सोलापूर जिल्हाध्यक्ष अॅड. नानासाहेब शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि पंढरपूर तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी पोलीस पाटलांच्या संघटनेचे कार्य, प्रलंबित प्रश्न तसेच आगामी काळातील संघटनेच्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. बैठकीदरम्यान पंढरपूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सोलापूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या पंढरपूर विभाग कार्याध्यक्षपदी अविनाश भारत कुरे पाटील (एकलासपूर) यांची निवड करण्यात आली. तर पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बाबासाहेब भाकरे, उपाध्यक्षपदी रामचंद्र कांबळे, सचिवपदी सतीश श्रीराम आणि कार्याध्यक्षपदी नारायण जाधव यांची सर्वानुमते निवड झाली.
महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी राणी शरद मोरे, तर उपाध्यक्षपदी सुनिता कोरके यांची निवड करण्यात आली.
दुष्काळग्रस्त परिस्थितीत तीन दिवसांचे मानधन देण्याचा निर्णय
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वपूर्ण सामाजिक निर्णय घेण्यात आला. राज्याध्यक्ष दिलीप आबा पाटील यांनी सामाजिक दायित्व म्हणून पंढरपूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी आपले तीन दिवसांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे आवाहन केले.
राज्य प्रसिद्धीप्रमुख तोफिक शेख यांनीही या निर्णयाला समर्थन देत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच गावागावांतील पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पोलीस पाटलांनी प्रशासनासोबत समन्वय साधून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत संघटनेच्या आगामी धोरणांवर तसेच पोलीस पाटलांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
प्रथम वर्ष डी.फार्मसीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड-१ दि. २४ सप्टेंबर २०२६ पासून सुरु
पत्रकारितेतील नवोदितांना घडवण्यासाठी पंढरपुरात २० सप्टेंबरला जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळा – अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचा पुढाकारनामांकित प्राध्यापकांचे मिळणार मार्गदर्शन
मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा १० हजारांपर्यंत नेत्रशस्त्रक्रिया : प्रणव परिचारक