September 8, 2024

ppr

शिवजंयती निमित्त स्वेरीतील १०२ जणांनी केले ऐच्छीक रक्तदान
स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम

Spread the love


शिवजंयती निमित्त स्वेरीतील १०२ जणांनी केले ऐच्छीक रक्तदान
स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात स्वेरीच्या तब्बल १०२ विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले.
‘शिवजयंती’ म्हटलं की तरुणांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारत असते. शिवजयंती साजरी करत असताना सर्वत्र अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. यामध्ये स्वेरी देखील मागे नाही. स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गंत ऐच्छीक रक्तदान शिबीर राबविण्यात आले. ‘शिवजयंती’ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे डॉ. राजकुमार कदम यांच्या हस्ते, डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर व श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तकेंद्र प्रमुख सिव्हील हॉस्पिटल ब्लड बँकेच्या इन्चार्ज डॉ. सरोज बोल्डे, पंढरपूर कॉटेज हॉस्पिटलचे डॉ.सुधीर भातलवंडे, पुरुषोत्तम कदम, नानासाहेब देवकर, कबीर काळेल व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती, डॉ.श्रीकृष्ण भोसले, प्रा.रविकांत साठे, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा.वैभव झांबरे व इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर राबविण्यात आले. यावेळी स्वेरी अंतर्गत असणाऱ्या एकूण १०२ जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. यावेळी श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत असलेल्या पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलच्या रक्तपेढीला पाचारण करण्यात आले होते. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीच्या ‘मेसा’ मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. यावेळी ‘डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल’च्या प्रमुख व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.