“छत्रपती शिवराय जन्मोत्सवानिमित्त ‘कर्मयोगी विद्यानिकेतन’ पंढरपूर चे
लाठी काठी सादरीकरण”
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आज छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त पंढरपुरातील विविध चौकांमध्ये लाठी - काठी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रीतीने छत्रपती शिवरायांच्या "मल्हारी मल्हारी" या गाण्यावर तालबद्ध रीतीने लाठीकाठी फिरवून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौक या ठिकाणी माजी नगरसेवक श्री. संतोष नेहतराव यांनी विद्यार्थ्यांचे व प्राचार्यांचे स्वागत केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा संभाजी ब्रिगेड या मंडळांनी देखील विद्यार्थ्यांना लाठीकाठी सादरीकरणास सहकार्य करून सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
यानंतर गोपाळकृष्ण मंदिर चौफाळा या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे सादरीकरण करून यानंतर महात्मा फुले चौक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यावेळी भगवा चौक तरुण मंडळाने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शेवटी श्रीनाथ चौक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लाठीकाठी सादरीकरण करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आणि प्रशालेच्या परिसरामध्ये म्हणजेच ठाकरे चौक या ठिकाणी शेवटचे सादरीकरण करून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्राचार्या मा. सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांची प्रेरणा मिळाली. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षक म्हणून श्री आकाश साबळे यांचे मार्गदर्शन लाभले. या सादरीकरण वेळी प्रशालेचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
More Stories
प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ
स्वेरीच्या अवंतिका आसबे यांची ‘टेक्निमाँट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड
स्वेरीच्या स्वराली जोशी यांची ‘इंटेलीपॅट’ या कंपनीत निवड