July 27, 2024

ppr

वसंतदादांनी दिलेला शब्द कल्याणराव काळे यांनी पूर्ण केला वाडीकुरोलीच्या सरपंचपदी लडाबाई काळे यांची बिनविरोध निवड

Spread the love

वसंतदादांनी दिलेला शब्द कल्याणराव काळे यांनी पूर्ण केला वाडीकुरोलीच्या सरपंचपदी लडाबाई काळे यांची बिनविरोध निवड
निर्मलग्राम ग्रामपंचायत वाडीकुरोलीच्या सरपंचपदी लाडाबाई लव्हाजी काळे यांची बिनविरोध निवड झाली.आज ग्रामपंचत कार्यालय वाडीकुरोली तेथे सरपंच पद निवड प्रक्रिया पार पडली सरपंच पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने प्राधिकृत अधिकारी आर. ए. शिंदे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीकरोली ग्रामपंचायत मध्ये सर्व महिला सदस्य कारभार पाहत असून आज लाडाबाई काळे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
वाडीकुरोली गावचा स्वाभिमान असणारे वसंतदादा काळे यांनी वीस वर्षांपूर्वी गावातील संभाअण्णा काळे यांच्या भावकीतील व्यक्तीला गावचे सरपंच करण्याचा शब्द दिला होता मात्र तत्कालीन काही अडचणीमुळे या भावकीला सरपंच पद देता आले नव्हते आज त्यांच्या भावकीतील राजकीय कोणताही वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील लाडाबाई लव्हाजी काळे यांना सरपंच पदाची संधी देऊन वडिलांनी दिलेला शब्द पुत्र कल्याणराव काळे यांनी खरा केला असून राजकारणामध्ये सुद्धा दिलेला शब्द पाळला जातो हे वसंतदादांचे संस्कार कल्याणरावांनी आजच्या निवडीतून खरे करून दाखवले आहेत अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सरपंच पदी निवड झाल्यानंतर लाडाबाई काळे यांनी सांगितले की सहकारी शिरोमणी वसंतदादांच्या पासून सुरू असलेल्या गावच्या विकासाची परंपरा आमचे मार्गदर्शक कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन कायम सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले .
यावेळी माजी सरपंच सुप्रिया काळे नूतन सरपंच लाडाबाई काळे यांचा सत्कार करून उपसरपंच अर्चना काळे- पाटील सदस्या राजाबाई काळे ,सुनिता काळे, शोभाताई कुंभार ,कांताबाई सोनवले , जनाबाई चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील कांतीलाल काळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आप्पासो पाटील, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासो काळे गुरुजी पांडुरंग काळे वसंत काळे सत्यवान नाईकनवरे सतीश काळे डॉ. अजित काळे नानासो काळे रामचंद्र काळे पाटील योगेश काळे सुनील काळे तलाठी कैलास गुसिंगे ग्रामसेवक एस. एम.मुलानी व गावातील महिला भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .