October 15, 2024

ppr

एक राखी भारतीय सैनिकासाठी पंढरपुरातील नाईकनवरे परिवाराचा उपक्रम

Spread the love


पंढरपुरातील नाईकनवरे .परिवारांनी सीमेवरील सैनिकांना पाठवल्या हजारो राख्या.पंढरपुरातील संतपेठ भाई_भाई चौक येथे राहणारे, समाजसेवक दिपक राजाराम नाईकनवरे.
यांनी एक राखी भारतीय सैनिकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला, समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला.
सैनिकाच्या योगदानातूनच संपूर्ण भारत देश सुखाने झोपू शकतो.
आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी दिवस रात्र आपल्या प्राणाची बाजी लावून प्रत्येक भारतीय जवान सीमेवर तैनात असतात,आणि सण असो वा आनंदाचा दिवस सैनिक सेवा हाच मोठा सण मानणारे सैनिक बंधू जवान आपल्या कुटुंबाची कोणतीही परवा न करता. दिवस-रात्र सीमेवर तैनात राहणारे,आपल्या भारत माता ची अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करणारे हे सैनिक बांधव.
तसेच सैनिक बांधवांमुळे आपण आपल्या भारत देशातमध्ये ताट मानणे, जगू शकतो. प्रत्येक भारतीय जवानाचा आदर्श घेऊन आपण या नव्या पिढीने पुढे जाऊन भारत माता सुजलम सुफलम करण्याचं काम भारतीय जवान करतात. मी एक बहीण म्हणून आई म्हणून माझ्या मुलाला किंवा भावाला अभिमानाने राखी बांधण्याचा हा आनंद मिळतो तो जगात कुठेही मिळत नाही.आज भारत मातेच्या जवानामुळे प्रत्येक युवक ऊर्जा मिळते.
तसेच त्यांनाही आपल्या प्रत्येक बहिणीची मायेचा प्रेमाचा ओलावा, अनुभवता यावा.
या जाणिवेतून एक राखी सैनिकासाठी ही संकल्पना मनात रुजवून पंढरपुरातील, सुनंदा राजाराम नाईकनवरे व त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी लहानापासून ते वृद्धापर्यंत हजारो राख्या एकत्र करून सीमेवर पाठवण्यात आल्या.
आपल्या भारत मातेच्या सीमेवर आपला लहान भाऊ देशासाठी सीमेवर भारत मातेची सेवा करतात,आणि आम्ही त्यांची लाडकी बहीण त्यांना राखी बांधण्यास योग जरी येत नसेल तरी,आम्ही पोस्टद्वारे एक राखी सैनिकासाठी हा उपक्रम राबवतो. आणि सैनिकाच्या हातामध्ये बहिणीने राखी बांधल्याने त्यांच्या मनगटात बळ येथे आणि आपल्या देशासाठी प्रामाणिकपणे आपल्या देशाची रक्षा करण्यास बळ मिळते. म्हणून आम्ही नाईकनवरे परिवार जर त्या वर्षी सीमेवर हजारो राख्या पाठवण्याचं काम करतो. संतपेठ येथील नाईकनवरे परिवार हे आदर्श कुटुंब मानले जाते कारण त्यांचे वडील ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय राजाराम महादेव नाईकनवरे यांचा वारसा त्यांची पत्नी व मुले पुढे चालवतात त्यांचा मोठा मुलगा मेजर विक्रम राजाराम नाईकनवरे व दिपक राजाराम नाईकनवरे, त्यांचे दोन मुलं नातू जावई सर्व नातेवाईक दादांचा वारसा जोपासतात.आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मेजर विक्रम राजाराम नाईकनवरे हे सुद्धा सीमेवर कार्य करत आहे त्यांची मातोश्री सुनंदा राजाराम नाईकनवरे आपला मुलगा देश सेवेसाठी काम करतो हे मला अभिमान आहे.तसेच बहिणीकडून आपल्या जवानांना राख्या पाठवण्याचं काम करत.
पंढरपूर मधील नाईकनवरे कुटुंबाने सैनिकांना प्रती प्रेम आणि आपुलकी, नाते जोडलेले आहेत. व्यक्त करता, याही वर्षी प्रेमाचे प्रतीक असलेली राखी देशातील ९ युनिट मधील, जवानांना राख्या पाठवल्या आहेत.
तसेच आपल्या देशातील सैनिकांना प्रचंड मानसन्मान दिला जातो. तसेच हे नाईकनवरे कुटुंब प्रत्येक सामाजिक आपुलकीचे नाते जोडणारे कुटुंब आहे.
सदर हा कार्यक्रम. पंढरपूर पोस्ट ऑफिस येथे घेण्यात आला यावेळी
अधिकारी सोमनाथ गायकवाड,साहेब विनोद धायगुडे,सपना सलगर,वैजनाथ महामुनी, शेख श्रीमती सुनंदा नाईकनवरे,दिपक नाईकनवरे राणी खंडागळे,व कर्मचारी शिपाई व विविध क्षेत्रातील मान्यवर संघटना कार्यकर्ते व महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते ..