पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त युनिक फाउंडेशन पंढरपूर यांच्यावतीने गीरगाय पालन, कुक्कूट पालन व बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांना चालना देवून प्रगतशील करणेसाठी व दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी, सुशिक्षित बेरोजगार महिला व पुरूष यांच्यासाठी पंढरपूर येथील संत गाडगे महाराज मठ स्टेशन रोड पंढरपूर येथे दि.09डिसेंबर 2024 ते 11डिसेंबर 2024 या कालावधीत सकाळी 11 ते02 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्याधिकारी श्री नंदकुमार दुपडे सर यशदा मास्टर ट्रेनर (मो.8208404208) यांनी दिली.या तांत्रिक प्रशिक्षणामध्ये गीरगाय पालन, कुक्कूट पालन व शेळीपालन यामध्ये जाती, निवड व प्रजनन, गीरगाय, कुक्कूट व शेळ्यांचा आहार, गोठा व्यवस्थापन (निवारा), चारा साठवण पध्दत, आजार, उपचार व नियंत्रण, शेळ्यांचे दूध-उपयोग, या सर्वाचे अर्थशास्त्र, या विषयी माहिती मिळणार आहे. तसेच उद्योजकीय प्रशिक्षणामध्ये प्रभावी संवाद कौशल्य, कार्पोरेट मार्केटिंग, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, बाजारपेठ पाहणी, विक्री कौशल्य, गीरगाय, कुक्कूट व शेळी पालन पूरक उद्योगातील संधी, शासकीय व निमशासकीय कर्ज योजना व अनुदानाची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राच्या व नाबार्डच्या विविध योजनांची माहिती व प्रकल्प अहवाल तयार करणे आदि माहिती या प्रशिक्षणातून दिली जाणार आहे.निसर्ग व पाणी यामुळे शेतकरी सतत अडचणीत येत आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय हा उद्योग म्हणून उभारणी घेत नसल्याने यास पर्याय म्हणून पशुधन जोपासणे काळाची गरज आहे. कमी चारा, कमी पाण्यात व कमी जागेत हा उद्योग प्रशिक्षण घेवून केल्यास बेरोजगारीची गंभीर समस्या मिटून शेतकरी व सुशिक्षित बेरोजगा
More Stories
प्रथम वर्ष डी.फार्मसीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड-१ दि. २४ सप्टेंबर २०२६ पासून सुरु
पत्रकारितेतील नवोदितांना घडवण्यासाठी पंढरपुरात २० सप्टेंबरला जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळा – अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचा पुढाकारनामांकित प्राध्यापकांचे मिळणार मार्गदर्शन
मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा १० हजारांपर्यंत नेत्रशस्त्रक्रिया : प्रणव परिचारक