December 21, 2024

ppr

‘भीमा’चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी

भीमा सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम २०२४-२५ जोमाने सुरू असून, या हंगामात आजअखेर गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २७०० रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे. २७०० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडीक यांनी दिली.कारखान्याचा गळीत हंगाम सक्षमपणे सुरू असून, तुलनेने यावर्षीचा हंगाम लहान असल्याने चालू गळीत हंगामात देखील जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा नियोजनबद्धरीत्या काम करीत असून, गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या हंगामातही भीमा कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला सर्वांच्या बरोबरीने दर देण्यास कटिबद्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंतीभीमा कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी यंत्राला प्राध्यान्य देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या उसतोड मजूर टोळ्या दाखल झालेल्या नाहीत. यामुळे यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर ऊस तोड केली जात आहे. तर ऊस टोळ्यांकडून वाहन धारकांची होणारी फसवणूक, शेतकऱ्यांची आर्थिक लूट या कारणांमुळे देखील शेतकरी आणि कारखान्याकडून यंत्राच्या साह्याने ऊस तोडीला प्राधान्य दिले जात आहे.