पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग दाखल होत आहे. तरुणांकडे गुणवत्ता आणि उत्साह असला, तरी कौशल्यपूर्ण आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी योग्य प्रशिक्षणाची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर नवोदित पत्रकारांना योग्य मार्गदर्शन व तांत्रिक कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने ‘जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पंढरपूर येथील इंदिरा गांधी चौकातील पत्रकार भवन येथे पार पडणार आहे. संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी ही कार्यशाळा खुली राहणार आहे.दिग्गज तज्ञांचे मार्गदर्शनकार्यशाळेत पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास लक्ष्मण भासके आणि अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू बाबासाहेब चंदनशिवे उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही तज्ज्ञ वृत्तलेखनातील बारकावे, डिजिटल मीडियातील बदल आणि बातमीची मांडणी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करतील.प्रमुख मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमास अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेश अध्यक्ष सतीश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव आणि जिल्हाध्यक्ष तथा आयोजक सचिन कुलकर्णी यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत.सहभागी होण्याचे आवाहन डिजिटल आणि मुद्रित माध्यमांत काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी व नवोदितांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा १० हजारांपर्यंत नेत्रशस्त्रक्रिया : प्रणव परिचारक
पंढरपुरात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक
वाढदिवसा दिनीही विकासकामांनाच प्राधान्य; पंढरीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरा