April 20, 2025

ppr

५१ घरकुलांचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Spread the love

प्रतिनिधी/-

माढा तालुक्यातील मौजे जाधववाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या ५१ घरकुलांचे भूमिपूजन माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पंतप्रधान आवास योजनेमधून नवीन घराचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आनंदाची बाब आहे ज्या लोकांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांनी योग्य पद्धतीने आपले घर बांधून त्याचा त्याचा उपयोग करावा तसेच ज्या लोकांना अद्याप पर्यंत ही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून ह्या योजनेचा लाभ घ्यावा, प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित निवारा मिळावा हा त्यांचा हक्कच आहे. माढा मतदारसंघाच्या विकसित मतदार संघासाठी सातत्याने मी देखील प्रयत्नशील असेल असे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले.

यावेळी सरपंच राहुल जाधव, चेअरमन शिवाजी भाकरे, आनंद आप्पा कानडे, मा.सरपंच वंदना जाधव, डीव्हीपी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब महाडिक, बापूसाहेब जाधव, शंभूराजे साठे, आबा साठे, जितू जमदाडे,गणेश साळुंखे, दयानंद जाधव, सोमनाथ राऊत, अनिल शिंदे, विजय भाकरे, नवनाथ जाधव विक्रम जाधव,तानाजी जाधव, प्रकाश उबाळे, सौदागर चव्हाण, सुनील कन्हेरे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.