पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी १९४ गुण मिळवून तालुका गुणवत्ता ५० तर जिल्हा गुणवंत यादीत २८७ गुणवत्ता आहे.
सध्या ज्ञानेश्वरी जाधव पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे जवाहरलाल नेहरू हायस्कूल मध्ये शिकत आहे. ज्ञानेश्वरी नितीन जाधव या विद्यार्थ्याने जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत २८७ तर तालुका गुणवत्ता यादीत क्रमांक ५० क्रमांक मिळविला आहे. तिने अनेक परीक्षेमध्ये यश संपादन केली असून यशाबद्दल तिचे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी गावातून पंचकोशी भागातून मोबाईलचे टेटस फेसबुकच्या माध्यमातून व हार पुष्पगुच्छ देऊन सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्ञानेश्वरी ही गरीब कुटुंबातील विद्यार्थीनीं आहे. ज्ञानेश्वरीची आई आरती जाधव कपडे शिलाईचा व्यावसायीक तर वडील नितीन जाधव शेतकरी आहे, जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी मधील मुख्याध्यापक घोंगडे सर शिक्षिका नकाते मॅडम, पांडुरंग नागटिळक सर, दत्तात्रय जाधव सर, नितीन जाधव सर, कुलकर्णी सर, माळी सर, पावार सर, यांनी विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी जाधव हिला सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. व सर्व शिक्षकांनी स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
पंढरपूर अर्बन बँक नवराष्ट्र सहकार पुरस्काराने सन्मानित…सहकार मंत्री मा. नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान…
माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
सिल्व्हरओक शाळेचे मोहोळ तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…..