पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये क्लीनोव्हेट सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचे आधुनिक सॉफ्टवेअर समाविष्ट असलेल्या लॅबचे उदघाटन भारताचे विख्यात अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मनियार यांच्या नेतृत्वाखाली ही अत्याधुनिक लॅब तयार करण्यात आली आहे. विशेषतः अमेरिका-युके (युएस-युके) हेल्थकेअर सिस्टीममध्ये एआय इंटिग्रेशन आधारित आधुनिक सॉफ्टवेअर समाविष्ट करण्याच्या उद्देशाने या लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. स्वेरीच्या या शैक्षणिक उपक्रमाला ‘एन्क्युटी टेक्नोलॉजीज्’ आणि ‘एनक्युब फार्मा’ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी या लॅबची संपूर्ण पाहणी करून, माहिती जाणून घेतली. ‘स्वेरीची गरुड भरारी’ पाहता भविष्यात विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी उंचावेल.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या लॅब साठी सुमारे २२ लाख रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे. या लॅब च्या माध्यमातून फार्मसीमधील विद्यार्थ्यांना आधुनिक सॉफ्टवेअर प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या लॅबमध्ये ओरॅकल अरगस क्लीनोव्हेट’ हे सॉफ्टवेअर समाविष्ट करण्यात आले आहे. या लॅबच्या माध्यमातून फार्मसीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशेष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. फार्मसी क्षेत्रात सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करण्याच्या नवीन संधी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. फार्माकोव्हिजिलन्स, मेडिकल कोडिंग अशा विविध डोमेनमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. विद्यार्थी जे सॉफ्टवेअर मधून शिक्षण घेत आहेत, त्याचाच प्रत्यक्ष वापर करून त्यांना प्रशिक्षणादरम्यानच कार्यानुभव मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्समध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना उत्तम व भरघोस पॅकेजच्या नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्लोबल सर्टिफिकेशन, नोकरीसंदर्भात मार्गदर्शन तसेच विविध संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आजपर्यंत एन्क्युटी टेक्नोलॉजीज्ने जवळपास दहा हजार हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. याचा स्वेरीतील विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होणार असून ग्लोबल सर्टिफिकेशन, संशोधन प्रकल्प, व्यवसाय, नोकरी, प्लेसमेंट आदी बाबतीत करिअर करण्यासाठी मदत मिळणार आहे. एन्क्युटी टेक्नोलॉजीज् च्या सीएसआरचे प्रमुख व महाविद्यालय समन्वयक शार्दुल भोसले, एन्क्युटी टेक्नोलॉजीज् च्या लीड टेक्निकल विभागाचे स्वप्निल कांबळे यांचे या लॅबसाठी सहकार्य लाभत आहे. या कार्यक्रमास सौ. सुयशा काकोडकर, डॉ. जान्हवी गांगल, स्वेरी या संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त डॉ. सुरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे प्रा. कोमल परचंडे, तसेच श्री एन्क्युटी टेक्नोलॉजीज् चे प्रतिनिधी शार्दूल भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
More Stories
धुळदेवमध्ये प्रेरणेचा उत्सव; ‘माणदेश रत्न’ पुरस्कारांनी वाढवली यात्रेची शोभा
पत्रकारांच्या मुलांच्या करिअरसाठी लाखो रुपयांची मदत; बार्शीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार
आमच्यावर बोलायला पालकमंत्र्यांना यावं लागतंय – भगीरथ भालके विरोधकांना! गल्लीबोळात फिरावे लागते आमदार अभिजीत पाटील यांची जाहीर टीका