November 21, 2024

ppr

पंढरपूर शहर व ग्रामीण मधून ओपन मटका कधी होणार क्लोज

Spread the love

पंढरपूर शहर व ग्रामीण मधून ओपन मटका कधी होणार क्लोज
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कल्याण व कल्याण नाईट तसेच मेेन मुंबई यासह आदी नावांनी रस्त्यांलगत असलेल्या काही पान टपर्यांमध्ये खुलेआम पणे मटका घेतला जात असल्याचे दिसुन येत आहे हा धंदा दिमाखात सुरू असुन त्यास कसल्याही प्रकारची भिती नसल्याने व या खेळामध्ये एका ठिकाणी बसुन १०% कमिशन मिळत असून अनेक तरूण याकडे आकर्षित होऊ लागले आहेत यामध्ये ओपन, क्लोज, ओपन पत्ती, क्लोज पत्ती, जॅकपॉट, संगम अशा प्रकारचे खेळ खेळले जातात तर या खेळामध्ये अगदी कमी पैशांमध्ये अधिक पैसे मिळवण्याचे आमिश नागरिकांना लागल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर अनेक जन खाजगी सावकारकीच्या जाळ्यात अडकले
आहेत परंतु हे सर्व उघड-उघड पणे होत असताना पोलिसांनी यावर कडक कारवाई करणे गरजेचे असताना तसे होताना दिसुन येत नाही. वास्तविक पहाता पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागामधिल अवैद्य धंदे व त्यातुन होणारी गुंडगिरी प्रवृत्तीच्या नागरिकांना रोखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाने पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर शहर व पंढरपूर तालुका ही दोन पोलीस ठाणे असतानाही यामध्ये करकंब व पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे स्वंतत्र करून पहिल्या दोन पोलीस ठाण्यांवरील अधिकचे कामकाज कमी करण्यासाठी प्रयत्न केले खरे परंतु पंढरपूर शहर व ग्रामीण भागामधिल अनेक ठिकाणी खुलेआम पणे मटका घेतला जात असल्याचे दिसुन येत आहे.
त्यामुळे निदान अता तरी पंढरपूर उपविभागीय अधिकारी विक्रम कदमह कारवाई करताना दिसत नाहीत त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष देशपांडे यांनीच स्वःता याबाबत अधिक लक्ष देऊन पंढरपूर मधिल ओपन मटका क्लोज करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे