October 18, 2024

ppr

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “हुतात्मा दिना” निमित्त श्रद्धांजली

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्त तसेच आपल्या देशासाठी ज्या महान व्यक्तींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांना आदरांजली म्हणून ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालय शेळवे पंढरपूर मध्ये दोन मिनिटे मौन (स्तब्धत:) पाळून आदरांजली वाहण्यात आली.
देशाच्या स्वातंत्रासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक 30 जानवारी रोजी संपूर्ण देशभर दोन मीनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्याच प्रमाणे या ही वर्षी सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजता कमयोगी अभियांत्रिकी मध्ये दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
तसेच ३० जानेवारी म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथि. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा अमर असा दीपस्तंभ आहे. आपल्या विचाराने सदैव धगधगणारी ती एक महान वैचारिक मशाल आहे. सत्य अहिंसा आणि शांतता या मार्गाने हिंदुस्तान आणि संपूर्ण जग सुखारी आणि समाधानी राहू शकते. हे जगाला आधुनिक काळात दाखवून देणारा जणूकाही एक ईश्वरी प्रेषित म्हणून गांधीजींना जगभर अजूनही मान्यता आहे.
एखाद्याला शरीर रूपाने या जगातून नष्ट केल्यानंतरही त्याचे विचार संपत नसतात. याउलट ते अधिकाधिक उजळून निघतात. हे महात्माजींच्या मृत्यूने वारंवार सिद्ध केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीना व त्यांच्या विचारांना ही कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालामद्धे आदरांजली वाहण्यात आली. प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी हुतात्मा दिंनानिम्मीत आदरांजली अर्पण केली.