May 29, 2024

ppr

सहकार शिरोमणीचाही हिशोब आम्हालाच चुकता करावा लागणार – अभिजीत पाटील

Spread the love

(सहकार शिरोमणीची थकीत बीले दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार असल्याची अभिजीत पाटील यांची ग्वाही)

(बी.पी.रोंगे यांच्यासह अनेक उमेदवारांनी केले अर्ज दाखल)

प्रतिनिधी / पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अजूनही या सत्ताधारी मंडळींनी गाळप केलेल्या ऊसाचे तसेच कामगार, वाहतूक ठेकेदार यांची देणी दिली नाहीत. यामुळे विठ्ठल प्रमाणेच आता या कारखान्याची देणी देण्यास बांधील राहणार असल्याची ग्वाही विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अभिजीत पाटील यांच्या गटाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दि.१८ मे रोजी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या गटाचे उमेदवारी अर्ज ट्रॅक्टर मधून रॅली काढून भव्य दिमाखात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यानंतर प्रत्रकाराशी संवाद साधताना चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटी भव्यशक्ती प्रदर्शन करून चक्क अभिजीत पाटलांनी ट्रॅक्टरचे सारथी होऊन, मागे उमेदवार सोबत घेऊन भव्य शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करत मिरवणूक काढण्यात आली. येथील प्रांत कार्यालय येथे सांस्कृतिक भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिजीत पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना म्हणाले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत होता. तेव्हा शेतकरी सभासदांच्या आर्शीवादामुळे निवडून आलो आहोत. तसेच प्रचारात शेतकरी सभासद, कामगार, ऊस वाहतूकदार सर्वांची थकीत बील दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार असा शब्द दिला होता. तो शब्द खरा करत आपण प्रामाणिकपणे काम करून थकीत बील दिली. त्याच धर्तीवर सहकार शिरोमणी अडचणीत आर्थिक अडचणीत असला तरी शेतकरी कामगार ऊस वाहतूकदार यांची देणी दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार. विठ्ठल कारखान्याप्रमाणेच चंद्रभागा कारखान्यावर कामकाज देखील केले जाईल अशी ग्वाही देण्यात आली. आम्ही या निवडणुकीत ताकदीने उतरलो असून यासाठी शेतकरी सभासद आम्हाला साथ देऊन विजयी करतील असा विश्वास यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.