June 24, 2024

ppr

इसबावीकर यंदा स्टॅम्प पेपरवर विकास कामांचे वचन लिहून देणाऱ्यालाच करणार अधिक मतदान

Spread the love

इसबावीकर यंदा स्टॅम्प पेपरवर विकास कामांचे वचन लिहून देणाऱ्यालाच करणार अधिक मतदान

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील सर्वात मोठे व पालखी महामार्गावरील उपनगर असलेल्या इसबावी भागामधील नागरिक यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जो उमेदवार या प्रभागातील तलाठी कार्यालय, अंतर्गत रस्ते, आरोग्य केंद्र, नगरपरिषद शाळा, बगीचा यासह आदी विकासात्मक कामांचे वचन स्टॅम्प पेपरवर लिहून देऊन त्याची पंढरपूर तहसील कार्यालय येथे रजिस्टर नोंदणीकृत नोटरी करून देणाऱ्या उमेदवारास अधिक मतदान करणार असल्याचे मतदारांनी निश्चित केले आहे मग तो उमेदवार कोणत्या पक्षाचा व आघाडीचा आहे ते न पाहता येथील मतदार त्यास विकासात्मक कामांच्या दृष्टिकोनातून त्यांनी दिलेले वचन व आश्वासन याकडे पाहून त्यांना अधिक मतदान करू असे येथील नागरिकांचे मत आहे येथिल मतदारांचे उमेदवाराकडून स्टॅम्प पेपरवर लिहून मागण्याचे कारण म्हणजे या अगोदर या भागामधून बरेच नगरसेवक होऊन गेले परंतु त्यांनी मनावा तसा या भागाचा विकास केला नाही परंतु निवडणुकीआधी त्या निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बऱ्याच विकास कामांची आश्वासन दिली होती परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर निवडणूकी आधी त्यांनी येथिल मतदारांना दिलेल्या आश्वासनांचा व मतदान करणाऱ्या नागरिकांचाही त्यांना पुर्णता विसर पडल्याचे चित्र दिसून आले आहे त्यामुळे यावेळी येथील नागरिकांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी जो उमेदवार विकास कामांचे वचन स्टॅम्प पेपरवर लिहून देईल त्या उमेदवारास अधिक मतदान करणार असल्याचा निर्णय घेतला आहे