September 8, 2024

ppr

कोकीळांच्या सुरात शिवसैनिकांचा सुर मिसळेना..! जिल्हाप्रमुख ठाकरे गटाच्या वसेनेच्या पदाधिकाऱ्यात अस्वस्थता

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी

भाळवणी ता.पंढरपूर येथे आठवड्याभरापुर्वी एक मारहाणीची घटना घडली. घटनेनंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.यात आरोपी म्हणून थेट शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे देखील नाव आले. अशा प्रकरणात नाव आल्याने अनेक अर्थाने भुवया उंचावल्या गेल्या.
गुन्ह्यांची नोंद झाल्यापासून गेले आठवडाभरापासून जिल्हाप्रमुख शिंदे हे आपला मोबाईल बंद करून फरार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे वरिष्ठ नेते जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळ हे चार दिवसांच्या सोलापुर जिल्हा दौऱ्यावर आले होते. संपूर्ण जिल्ह्यात अर्थात त्यामध्ये सांगोला,माळशिरस या तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी विविध कार्यक्रम व शाखा उदघाटन कार्यक्रम कोकीळ यांनी पार पाडले. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांना संपर्कप्रमुखांसोबत जिल्हाप्रमुख शिंदे हे कुठेच दिसले नाहीत. याची देखील कुजबुज शिवसैनिकांमध्ये होती.
प्रसारमाध्यमांमध्ये या गुन्ह्याबाबतच्या बातम्यांमध्ये प्रामुख्याने शिंदे यांचे नाव आल्याने जिल्ह्याभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची देखील कोंडी झाली.
संपर्कप्रमुखांनी दौरा आटोपून मुंबईत पोहोचल्यानंतर फोन व मेसेजेस द्वारे शिवसैनिकांना रस्त्यावर उतरण्याचे व आपापल्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यात जावुन या गुन्ह्याविरोधात आवाज उठवण्यास सांगितले, संपर्कप्रमुखांची ही सुचना केवळ हवेत विरली कारण, एकाही पदाधिकाऱ्याने रस्त्यावर उतरणे तर सोडाच साधा निषेधाचा चकार शब्द देखील काढला नाही.
जिल्हाप्रमुख आठवडाभरापासून फरार आहेत,बाहेर राहुनच त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज देखील केले परंतु तो अर्ज फेटाळण्यात आल्याने तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. मात्र एवढ्या गंभीर गुन्ह्यात थेट नाव आल्याने याची चर्चा मात्र जिल्हाभर झाली आहे.
शिवसेनेच कोणीही पदाधिकारी निषेध करण्यास अथवा रस्त्यावर उतरण्यास तयार नाहीत,शेवटी संपर्कप्रमुखांनाच मुंबईतून निषेध करावा लागला. परंतु याला देखील शिवसैनिकांनी बळ न देता शांत राहणेच पसंत केले.
एवढा मोठा गुन्हा दाखल होवुनही जिल्ह्यातील पाचपैकी केवळ दोन जिल्हाप्रमुखांनी काही निवडक शिवसैनिकांसह या प्रकरणाबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेत औपचारिकता पुर्ण केली पण इतर दोन जिल्हाप्रमुख मात्र बाबत मौन बाळगूनच आहेत. अर्थात त्यांनी संपर्कप्रमुखांच्या आदेशाला तितकेसे गांभीर्याने घेतले नाही.
जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांपैकी कोणीच याबाबत बोलत नसताना शिवसेना संपर्कप्रमुख कोकीळ यांनी मात्र या संपुर्ण गुन्ह्याबाबत गांभीर्यपूर्वक संपुर्ण माहिती न घेता आढावा न घेता हा विषय थेट राज्यातील शिवसेनेच्या दोन गटांच्या लढाईवर आणुन ठेवला व कोकीळ यांनी शिंदे गटावर याचे आरोप करत या मारहाणीच्या गंभीर घटनेला राजकीय वळण देण्याचे काम केले खरे,मात्र शिवसैनिकांनीच संपर्कप्रमुखांच्या या दाव्यास महत्व न देता शांतता बाळगल्याने संपर्कप्रमुखांच्या आरोपांना देखील तितकेसे महत्व उरले नाही.

शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे हे गेल्या पंधरा विस”

वर्षांपासून तालुकाप्रमुख तर सहा वर्षापासून जिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर खोटी केस झाल्यानंतर तालुक्यातनच नव्हे पंढरपूर विभागातून उत्स्फूर्त पणे निषेध अंदोलन करून शिवसैनिक रस्त्यावर उतरणे अपेक्षित होते मात्र पंढरपूर तालुक्यातील शिवसैनिकासह पदाधिकाऱ्यांकडून देखील संभाजी शिंदे यांची पाठराखण होताना दिसुन येत नसल्याने संभाजी शिंदे यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

संभाजी शिंदे यांना अत्मपरीक्षण करणे गरजेचे !