मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील जड वाहतूक बंद व शहरात सीसीटीव्ही बसण्यात यावेत यासाठी वारी परिवाराच्या वतीने प्रांताधिकारी बि आर माळी साहेब, पोलीस निरीक्षक नयोमी साटम मॅडम व मुख्याधिकारी नगरपरिषद मंगळवेढा यांना निवेदन देण्यात आले मंगळवेढा शहरातून जड वाहतूक सुरू असल्यामुळे आतापर्यंत बरेच अपघात झाले आहेत अनेक शाळेचे विद्यार्थी जेष्ठ नागरिक महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवेढ्यातील होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मंगळवेढा शहरातील प्रत्येक चौकात चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे त्यामुळे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसणार आहे यासाठी वारी परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी अजित जगताप,विलास आवताडे,दिलीप अडसूळ,विजय हजारे,स्वप्नील फुगारे,विष्णुपंत भोसले,डी के साखरे,ज्ञानेश्वर मंडले,नाना भगरे,रविकिरण जाधव,चंद्रकांत चेळेकर,रविराज जाधव,परमेश्वर पाटील,विनायक कलुबरमे,सतीश दत्तू उपस्थित होते
More Stories
आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना पंढरपूर नगरपरिषदेकडून करण्यात आले आवाहन..!
सिद्धेवाडी माजी विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिवाजी जाधव यांचे निधन
सिद्धेवाडी माजी विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिवाजी जाधव यांचे निधन