नेवासा प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा नेवासा च्या वतीने नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्गावर सोमवार दिनांक चार रोजी आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोकोला मराठा समाजा बरोबरच सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी उपस्थित राहून मराठा समाजाला आपला पाठिंबा व्यक्त केला.मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक कमलेश नवले म्हणाले जे पण लोक जमलेले आहे यामध्ये फक्त मराठा समाज नसून सर्व जाती धर्मातील आहे. मराठा समाजाला सर्व जातींमध्ये मोठा भाव असं म्हटलं जातं या पुढील मोर्चामध्ये फक्त मराठा समाज नसून तर बाळाला बारा बलुतेदार ही असतील. माझ्यासमोर आजूबाजूला सर्व उभे राहणाऱ्या लोकांच्या साक्षीने मी सांगतोय की प्रचंड ताकतीने नेवासा तालुका आम्ही सर्वजण बंद करणार आहोत. मी मराठा क्रांती मोर्चा चा समन्वयक या जबाबदारीने अत्यंत जबाबदारीने सांगतोय की हा घडलेला प्रकार पूर्णपणे षडयंत्रयुक्त होता याचा निषेध करतो.यावेळी रास्ता रोको सुरू असताना अंबुलन्स आल्याने मराठा बांधवांनी त्वरित रस्ता मोकळा करून दिल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी आपले आभार व्यक्त केले.या वेळी मराठा क्रांती मोर्चा नेवासा चे रावसाहेब घुमरे,गणेश निमसे,प्रदिप आरगडे,शुभम आरगडे,छञपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,सागर नवथर,संकेत आरगडे,अरविंद आरगडे,स्वप्निल गरड,अनिल तारे,शिवसेनेचे नारायण लष्करे,शिवसेनेचे शाखाप्रमुख गणेश झगरे,पी आर जाधव,गणेश चौगुले,विजय गाडे,बाळासाहेब माटे,कल्याण आगळे,गणेश आगळे,भारत हाफसे,गणेश घुले,आशिष घुले,बालेन्द्र पोतदार,सुदाम कापसे,बन्सी सातपुते,मुन्ना चक्रनारायण,धनंजय काळे,राजू काळे,निरज नागरे,माऊली देवकाते,सतीश निपुंगे,नितीन आडसुरे,संदेश काळे,सचिन नागपूरे,सोमनाथ गायकवाड,राष्ट्रवादी चे दादासाहेब गंडाळ,व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शासकीय नोकरी :- मुख्यमंत्र्यांनी केली पाच लाखाची घोषणा पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी चेअरमन अभिजीत पाटील यांचे मोठ योगदान
अभिजीत पाटील यांना महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांकडून आदर्श चेअरमन पुरस्कार प्रदानआदर्श चेअरमन पुरस्कार हा श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासदांना समर्पित