October 18, 2024

ppr

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शासकीय नोकरी :- मुख्यमंत्र्यांनी केली पाच लाखाची घोषणा पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली

Spread the love

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शासकीय नोकरी : मुख्यमंत्र्यांनी केली घोषणापाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली

प्रतिनिधी : पंढरपूर

यंदाचा महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख यांस द्वितीय श्रेणीतील शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन देत पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रविवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र केसरी पै. सिंकदर शेख यांचा मुबंईत वर्षा निवासस्थानी सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे नेते राजाभाऊ खरे, शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, वस्ताद बाळासाहेब चवरे, पैलवान योगेश बोंबाळे आदी उपस्थित होते.मोहोळचा मल्ल सिकंदर शेख याने यंदाचा महाराष्ट्र केसरी ‘किताब जिंकला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी विशेषतः मोहोळ तालुक्यासाठी हे अभिमानास्पद असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिकंदर शेख याला भेटण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी रात्री वर्षा निवासस्थानी सिकंदर शेख याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिकंदर शेख याचा सत्कार केला. सिकंदर शेख ने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही अतिशय कष्टाने, कुस्तीतील कौशल्याने महाराष्ट्र केसरीचा ‘किताब जिंकला असल्याची माहिती राजू खरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिकंदर शेख याच्याखेळाचे कौतुक केले, असेच चांगले खेळत रहा, महाराष्ट्राच्या कुस्तीचा लौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सिकंदर शेख यास रोख पाच लाख रुपये आर्थिक मदत आणि द्वितीय श्रेणीतील शासकीय नोकरी येत्या १५ दिवसात मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.