September 8, 2024

ppr

सुमंगल महिला अर्बन बँकेचे आज खा.सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते मल्लेवाडीत उद्घाटन

Spread the love

मंगळवेढा प्रतिनिधी

सुमंगल महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि, या बँकेचा आज सोमवार दि.11 सप्टेंबर रोजी मल्लेवाडी ता.मंगळवेढा येथे उद्घाटन समारंभ होणार असल्याची माहिती चेअरमन सौ.दिपाली काकासाहेब मोरे यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 3 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी सांगोला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुरावजी गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनरावजी आवताडे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील,श्री विठ्ठल एज्यु. सोसायटीचे सचिव बब्रुवाहन रोंगे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुलजी शहा, सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, दामाजीचे माजी व्हा.चेअरमन मनोहर कलुबर्मे, मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्वयक माऊली पवार, शि.प्र.मंडलाच्या सचिवा सौ.तेजस्विनी कदम, मा.जिल्हा परिषद सदस्य अशोकभाऊ शिंदे, दामाजीचे माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार, एल.के.पी. मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगोले, नगरसेवक विनोद भोसले, माजी नगराध्यक्ष बबनराव ताड आदीजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने सुमंगल महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेची स्थापना केली गेली आहे.
सांगोला तालुक्यातील शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आता मंगळवेढा तालुक्यात शाखा सुरू होत आहे. सुमंगल महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे. मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे. तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे. व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली आहे. सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 👉सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा, व्यावसायिक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत.