October 18, 2024

ppr

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची पंढरपूर शहरातून भव्य मिरवणूक

Spread the love

पंढरपूर –

‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे छत्तीसाव्याजयंतीनिमित्त येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंतविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक पंढरपूरशहरातून फुलांनी सजवलेल्या रथातून ढोल ताशाच्या निनादात काढण्यात आली. यामिरवणूकीच्या सुरुवातीस रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अमरजीतपाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, चेअरमन अभिजित पाटील, बाळासाहेबनेहतराव, सुभाष भोसले, डॉ. दादासाहेब साळुंखे, अप्पासाहेब पाटील, डॉ.राजेंद्र जाधव, जगन्नाथ भायगुडे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे,उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य राजेंद्र कवडे, अधिष्ठाताडॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, मुख्याध्यापक सौ. अनितासाळवे व पर्यवेक्षक युवराज आवताडे आदी मान्यवरांनी महाविद्यालयातीलकर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.’ या मिरवणूकीस महाविद्यालयातून प्रारंभ होवून पुढे ही मिरवणूककर्मवीर पथ, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, नवी पेठ, अर्बन बँक, भादुलेचौक, नगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, डॉ. बाबासाहेबआंबेडकर स्मारक, ग्रामीण पोलीस स्टेशन, मार्केट यार्ड या मार्गानेमहाविद्यालयात आली. या मिरवणूकीत विद्यार्थिनीचे झांज पथक, टिपरी नृत्यपथक आणि छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान भेटीचा जिवंत देखावा हे खासआकर्षण ठरले. या मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार आणिकार्याच्या विषयी माहिती देणारे फलक विद्यार्थ्यांनी घेतले होते.शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या घोषणा सहभागी झालेल्याविद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी प्रा. डॉ. अमर कांबळे, प्रा. सुमनकेंद्रे, प्रा. डॉ. भारती सुडके, प्रा. कुबेर गायकवाड यांनी निवेदन केले. या मिरवणुकीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना,कमवा व शिका योजना, सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आदीविभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनीबहुसंख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकी वेळी पंढरपूर शहरातील रयत शिक्षण संस्था प्रेमीनागरिक, माजी विद्यार्थी, राजकीय नेते आणि व्यापारी यांनी कर्मवीरांच्याप्रतिमेस अभिवादन केले. ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रमेश शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय चौधरी, राष्ट्रीय छात्र सेना लेफ्टनंट प्रा. डॉ. समाधान माने,प्रा. डॉ. सुशीलकुमार शिंदे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. दत्ता डांगे, प्रा.दत्ता खिलारे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, अभिजित जाधव, सुरेशमोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले………………………………………………………………………………………………………………………………..