पंढरपूर प्रतिनिधी
आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सिद्धेवाडी उपकेंद्र येथे आयुष्यमान भव मोहिमेचे उद्घाटन सिध्देवाडी गावच्या सरपंच सौ.रोहिणी सारंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले
आयुष्यमान भव मोहिम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत राबवण्यात येणार आहे यामध्ये अभियानाचे प्रमुख घटक आयुष्मान आपल्या दारी 3.0, त्यानंतर रक्तदान मोहीम, आयुष्मान सभा, अवयव दान करणे तसेच नेत्रदान जागृती मोहीम, आयुष्यमान मेळावा, स्वच्छता मोहीम, अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, वय वर्ष 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. आयुष्मान भव मोहिम याची माहिती डॉ.रूपाली सुरवसे, यांनी दिली. यावेळी ग्रामसेवक शेनवे, ग्रामपंचायत सदस्य, सिस्टर शिवशरण, आरोग्य सेवक ज्ञानेश्वर मोरे, सर्व आरोग्य कर्मचारी आशा वर्कर ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
More Stories
आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना पंढरपूर नगरपरिषदेकडून करण्यात आले आवाहन..!
सिद्धेवाडी माजी विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिवाजी जाधव यांचे निधन
सिद्धेवाडी माजी विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिवाजी जाधव यांचे निधन