September 8, 2024

ppr

“न्यु सातारा बी.सी.ए. मध्ये विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना पंढरपुर विभाग आढावा बैठक संपन्न”

Spread the love

पंढरपूर :- प्रतिनिधी “न्यु सातारा बी.सी.ए. मध्ये विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना पंढरपुर विभाग आढावा बैठक संपन्न”-पंढरपूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे पंढरपूर विभाग आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठक करिता मा.प्रा.डॉ.राजेंद्र वडजे संचालक राष्ट्रीय सेवा योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी मा.प्रा.डॉ.संजय मोजमुले पंढरपूर विभाग समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घरण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी श्री.शेडगे डी.डी हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे मा.प्रा.डॉ.राजेंद्र वडजे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या नंतर राष्ट्रीय सेवा योजना समन्वयकां तर्फे N.S.S गीत सादर करण्यात आले. या नंतर न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए चे उप प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण ताठे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. आढावा बैठकी मध्ये राष्ट्रीय सेवा योजना पंढरपूर विभाग समन्वयक मा.प्रा.डॉ.संजय मोजमुले यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये पंढरपूर विभागाच्या एकूण राष्ट्रीय सेवा योजना कामकाजाचा आढावा सादर केला. या मध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षातील सर्व कामकाजाचे नियोजन व पुढील कामकाज या विषयावर लक्ष केंद्रित केले. तसेच शासन स्तरावर व विद्यापीठ स्तरावर प्राप्त होणाऱ्या सर्व पत्रांना वेळेत प्रतिसाद देण्याचे आवाहन केले व राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी घडविण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्रा.डॉ.राजेंद्र वडजे आपल्या मार्गदर्शन पर भाषणात शासन स्तरावरून येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व विद्यापीठ स्तरावरून त्याचे करावयाचे नियोजन याची सविस्तर चर्चा केली तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजना एकक असलेल्या महाविद्यालयांना चालू वर्षाची विद्यार्थी नोंदणी,सल्लगार समिती,बैठक नियोजन ETI प्रशिक्षण इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित करून त्याची अंबलबजावणी करण्याचे आवाहन केले. सदर बैठकी करिता राष्ट्रीय सेवा योजना पंढरपूर विभागातील सर्व महाविद्यालयांचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.कुलकर्णी बी.पी यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए चे उप प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण ताठे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजाराम (नाना) निकम साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.