November 21, 2024

ppr

नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सामूहिक नागरी सत्कार

Spread the love

मंगळवेढा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सामूहिक नागरी सत्कार

गट-तट बाजूला ठेवून गावांचा सर्वांगानिक विकास करावा – चेअरमन अभिजीत पाटील

ज्यांचा पराभव झाला त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने काम करण्याची उमेद ठेवावी- चेअरमन अभिजीत पाटील

प्रतिनिधी पंढरपूर/-

नुकत्याच मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायती ची निवडणूक चुरशीशी पार पडली असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चेअरमन अभिजीत पाटील यांच्या पॅनलमधील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ दि.१० नोव्हेंबर रोजी जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाला.. यावेळी खडकी, मानेवाडी, पाटखळ, निंबोणी, भाळवणी, ब्रह्मपुरी, बालाजीनगर, डिकसळ, अकोला, चिखलगी, लक्ष्मी दहिवडी, देगाव, आंधळगाव, जुनोनी, खूपसंगी, पडोळकरवाडी या गावातील सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडू भैरी तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील संतोष रंधवे स्मिताताई अवघडे माणिक गुंगे मुजमिल काजी संचालक संजय खरात सचिन वाघाटे उमेश मोरे गणेश ननवरे तात्या गडदे मा. सरपंच दादासाहेब जाधव, तानाजी पाटील, अनिल आदलिंगे, आंधळगाव येथील काशिनाथ पाटील, शेलेवाडी माजी सरपंच तुकाराम चव्हाण, कचरेवाडी माजी सरपंच दादासाहेब जाधव, आंधळगाव माजी सरपंच महादेव माळी, भाळवणी माजी सरपंच ज्ञानेश्वर भंडगे, मानेवाडी माजी सरपंच आनंदा आंमुगे, शेलेवाडी माजी सरपंच ज्योतीराम चव्हाण, निंबोणी माजी सरपंच बिंटू खांडेकर, डिकसळ मनोहर शिंदे सर, चिखल्लगी माजी सरपंच अमृत उमराणे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जोतीराम पवार, डिकसळ मनोहर शिंदे, नवनाथ शिंदे, अनिल पाटील, लक्ष्मण शिंदे, शहाजान पटेल, पडळकरवाडी माजी सरपंच विराज झंजे, यासह प्रमुख नवनिर्वाचित सरपंच शेलेवाडी येथील सुनीताताई माळी, आंधळगाव लहुजी लेंडवे, खडकी संजय रजपूत, डिकसळ सरूबाई लांडगे, रेड्डे येथील सुनील थोरबोले अनेक सदस्यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब जयंती पाटील सुप्रियाताई सुळे रोहित दादा यांच्याकडे देखील पाठपुरावा करून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी मी देखील आपल्या सोबत असेल असा शब्द यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी यावेळी दिला. जनता आणि विकास हाच केंद्रबिंदू मानून जनतेची सेवा करण्यासाठी मतदान रुपी निवडून दिले. त्यातूनच महाराष्ट्र राज्याच्या अनेकानेक योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोचवाव्या. गटतट बाजूला ठेवून गावच्या सर्वांगानिक विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाचा सर्वांगानिक विकास करावा विकासाचे धोरण ठेवावे. लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी गावासाठी प्रत्येक योजना अंमलात आणाव्यात त्यासाठी मी देखील कटिबद्ध असेल असा शब्द राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी यावेळी दिला…