June 14, 2025

ppr

कल्याणराव काळेंच्या कारखान्यावर वसंत केसरी कुस्तीचा आखाडा रंगणार

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. वसंतराव काळे यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर (दि. ९ फेब्रुवारी) दुपारी दोननंतर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व आ. यशवंत माने यांच्या
अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी दिली.
स्व. वसंतराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात येते. यंदाचे १८ वे वर्ष असून आजपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी वसंत केसरी कुस्ती आखाडा गाजवलेला आहे. यावर्षी ८६ किलोंपेक्षा
जास्त वजन असलेल्या ओपन गटामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या पैलवानास एक लाख एक हजार रुपये रोख बक्षीस व चांदीची गदा देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या पैलवानास ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २५ हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकास ११ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जाणार असून या कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे होणार आहेत.

You may have missed