April 13, 2024

ppr

आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला निराधराला आधार सांगोला राष्ट्रवादीचा आदर्शवत ऐतिहासिक निर्णय

Spread the love

सांगोला प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवनाथ मोरे यास कार्यकर्त्याच्या वर्गणीतून पक्के घर

सांगोला/प्रतिनिधी:: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवक्ता असलेल्या एका गरीब कुटुंबातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला राहण्यासाठी घर नसल्याचे लक्षात येताच मा.आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या सहकार्याने पक्षातील कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून पक्के घर बांधून देत इतिहास रचला आहे. ऊसतोडीसाठी जाणाऱ्या व पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्याची घराची अडचण दूर करून सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र पुढे ऐतिहासिक आदर्श ठेवला असल्याची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात होत आहे.

परिस्थितीशी झगडत असताना ऊसतोड, शेतमजुरी अशी पडेल ती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शिरभावी ता. सांगोला येथील कार्यकर्ता नवनाथ मोरे यांनी मा आ दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.पक्षात आल्यानंतर त्याच्या कार्याची धडपड पाहून आबांनी त्यास सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवक्ता म्हणून त्याची निवड केली. त्यानंतर त्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिकपणे संघटन वाढवण्याचे काम केले.परंतु अशा या गरीब कार्यकर्त्याच्या कुटुंबातील लोकांना राहण्यासाठी घर ही नसल्याची बाब दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या लक्षात आली. दीपकआबांनी ही बाब कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून देत नवनाथ मोरे यास घर बांधून देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या मदतीने घेतला.त्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी प्रामाणिक साथ देत स्वतःच्या वर्गणीतून नवनाथ मोरे यास पक्के घर बांधून देत ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य कार्यकर्त्यांनी एका सामान्य परंतु पक्षासाठी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचे हक्काचे घर बांधून देत महाराष्ट्र पुढे नवीन आदर्श निर्माण केला असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.