पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात डिप्लोमा इंजिनिअरिंगचे ८७ व डिग्री इंजिनिअरिंगचे १८४ रक्तदाते असे मिळून एकूण २७१ विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले. ‘शिवजयंती’ म्हटलं की तरुणांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. शिवजयंती साजरी करत असताना सर्वत्र अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गंत आणि पदविका अभियांत्रिकी यांच्या वतीने ऐच्छीक रक्तदान शिबीर राबविण्यात आले होते. ‘शिवजयंती’च्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा.स्वामीराज भिसे यांच्या हस्ते व मंत्रालयातील सचिव आनंदराव माळी, विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.आर.मुंडे, आर्किड इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.जे. पी. दफेदार, भीमराव जाधव, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रविकांत साठे, डॉ. एम.एम. आवताडे, डॉ.डी.एस.चौधरी, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, इंजिनिअरिंग व फार्मसीचे स्टुडंट कौन्सिलचे सचिव आदित्य जगदाळे, पूजा बत्तुल आणि इंजिनिअरिंग व फार्मसीमधील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अक्षय ब्लड बँक, सोलापूर या रक्तपेढीला आमंत्रित केले होते. रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. सोनिया शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचे जनसंपर्क अधिकारी सागर जाधव व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस. साठे, डॉ. डी.एस. चौधरी, डॉ.एम.एम अवताडे, समन्वयक प्रा.के.एस. पुकाळे, प्रा.बी.टी. गडदे, प्रा. एस.बी.खडके, प्रा.जी.जी. फलमारी, प्रा.पी.व्ही. पडवळे, प्रा.एम.ए.सोनटक्के, प्रा.एस.डी. इंदलकर व इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर राबविण्यात आले. यावेळी स्वेरीच्या २७१ जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीच्या ‘मेसा’ मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.
More Stories
आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना पंढरपूर नगरपरिषदेकडून करण्यात आले आवाहन..!
सिद्धेवाडी माजी विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिवाजी जाधव यांचे निधन
सिद्धेवाडी माजी विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिवाजी जाधव यांचे निधन