June 24, 2024

ppr

पंढरपूरच्या राजकारणात आज पासून आणखी एक नवा परिवार

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधि

पंढरपूर तालुक्यात आणखी एक नवा परिवार दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजीत पाटील यांनी अचानकपणे शरद पवार गटाशी फारकत घेत सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ही पाठिंबा सभा आज श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्य स्थळावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडत असुन या सभेसाठी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मोठ्याप्रमाणावर आपले शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी अनेक गावांना वाहनांची सोय उपलब्ध करून देत मतदारांना सभेसाठी येण्याचे आवाहन केले असल्याचे दिसुन आले तसेच यात आज या सभेला आलेल्या अनेक वाहनांवर स्वेरी परिवार असे लिहलेले बॅनरही दिसत होते श्री.विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे संस्थापक सचिव बब्रुबान रोंगे यांनीही त्यांच्या स्वेरी परिवाराची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले त्यामुळे आज पर्यंत पंढरपूरच्या राजकारणात पांडुरंग व विठ्ठल हे दोन परिवार अग्रेसर असत परंतु या आजच्या पाठिंबा मेळाव्याच्या अनुषंगाने पंढरपूरच्या राजकारणात आणखी एक नवा परिवार उतरल्याचे दिसून आले आहे