पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर येथील प्रसिद्ध वृत्तपत्रलेखक, कथाकथनकार, साहित्यिक, नाट्यकर्मी, खेळाडू व आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिकातून पंढरपूरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशा स्व. आप्पासाहेब चव्हाण सर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जिल्हास्तरीय पुरस्कार – २०२५ देण्यात येणार आहेत. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, हार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कारासाठी जिल्हा स्तरावरावरून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी मागील (२०२२ / २०२३ / २०२४) या तीन वर्षांत प्रकाशित झालेल्या दोन साहित्यकृतीबरोबर साहित्यिकाने छायाचित्रासह आपले परिचय पत्र पाठविणे आवश्यक आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी परिचय पत्र व कार्याचा आढावा पाठविणे आवश्यक आहे. स्व.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ०४ मे, २०२५ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार दिले जाणार आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींनी आपले प्रस्ताव .अमरसिंह आप्पासाहेब चव्हाण ( 9822369292 / 9834726747 ), ‘वैष्णव’ सदन, लक्ष्मी नगर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौकाजवळ, पंढरपूर :- 413304 जिल्हा :- सोलापूर या पत्त्यावर २० एप्रिल, २०२५ पूर्वी पोहोचतील असे पाठवावेत. अधिक माहितीसाठी कवी रवि वसंत सोनार – ९९२२५१४३००, डॉ.सचिन लादे – ७५८८२१६५२६ व मदार केसकर – ९४२२३८०१४६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अमरसिंह चव्हाण, .अमोल चव्हाण व प्रताप चव्हाण यांनी केले आहे.
More Stories
पंढरपूर- माढा मतदारसंघाचे आ.अभिजीत पाटील आंदोलन स्थळी दाखल, निवेदन स्वीकारले येत्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवणार
स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे उद्या उद्घाटन समारंभ व पायाभरणी सोहळा
ज्ञानेश्वरी जाधव हिचे जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा यश