पंढरपूर :- प्रतिनिधी
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
दिनांक 08/ 04/2025 रोजी जि प शाळा नेपतगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ( सन 2024- 25)पंढरपूर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांच्या हस्ते संपन्न.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख अनिल बंडगर होते. याप्रसंगी सरकोली शाळेचे मुख्याध्यापक ह.जा. भोसले गुरुजी, व्यवस्थापन समितीचेक्ष अध्यक्ष सोमनाथ कदम सदस्य लहू घोडके माजी अध्यक्ष मायाप्पा हेगडकर, दिगंबर वाघ, ज्ञानेश्वर लवटे, उपस्थित होते
यावेळी इंग्रजी शब्द पाठांतर व सामान्य ज्ञान स्पर्धा यासाठी विनोद जाधव गुरुजी यांनी ट्रॉफी, वही ,पेन बक्षीस दिले.
मंथन परीक्षांमध्ये राज्य जिल्हा व तालुका स्तरावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात आली.
शाळा स्तरावरती घेण्यात आलेल्या स्पर्धा लिंबू चमचा, पोत्यातील उड्या, दोरी उड्या, लंगडी, खो खो, बुक बॅलन्स, या खेळातील विद्यार्थ्यांनाही शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात आली. छत्रपती परिवार मरवडे तसेच अजंठा आर्ट अकॅडमी सांगोला या ठिकाणी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात आली. रंगीत खडू पेटी, पाणी बॉटल, कंपास ,इयत्ता पाचवी चे प्रश्नसंच, इत्यादी बक्षीसे विद्यार्थ्यांना देण्यात आली. गटशिक्षणाधिकारी लिगाडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्याचे कौतुक ही केले. आणि त्यांना शाब्बासकी दिली. व शिक्षकांचेही अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी लिगाडे यांनी वर्गखोल्यांची पाहणी केली व परिसर पाहणी केली. सातवी, पाचवी, दुसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांचे वाचनही घेतले, यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी इंटर ऍक्टिव्ह बोर्ड चा वापर करून दाखवला. तसेच भोपळे सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी घोडके मॅडम चेतना जाधव मॅडम खिल्लारे मॅडम विनोद जाधव गुरुजी हरिभाऊ लेंडवे गुरुजी इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद भोपळे गुरुजी यांनी केले.
More Stories
खेलो इंडिया युथ गेम्स, पाटणा येते होणाऱ्या स्पर्धेसाठी अथलेटिक्स पंच म्हणून चेतन धनवडे यांची निवड!
“स्व.आप्पासाहेबांनी कर्तव्यदक्षतेचा संस्कार पेरला…!”:- वामनराव माने “स्व.आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…!”
सुस्ते येथे ॲडिशनल ट्रान्सफॅरमरचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भुमिपूजनरखडलेल्या कामांना सुरू करून गती देणे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम – आ.अभिजीत पाटील.