जॉय सामाजिक संस्थेकडून आदर्श संपादक प्रशांत माळवदे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेच्या १० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक ७ जून २००५ रोजी सायंकाळी जोगेश्वरी येथील अस्मिता भवन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटना, व्यक्तींचा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशांत माळवदे यांना सन्मान चिन्ह,शाल,प्रमाणपत्र, जॉय ऑफ गिविंग चे मेडल देऊन राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे. यावेळी विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून जोगेश्वरी भूषण डॉ एम डी वळंजू, कामगार नेते अविनाश दौंड, उच्च न्यायालयाचे वकील जगदीश जायले, समुपदेशक व मार्गदर्शक ऍड रूषीला रिबेलो, जेष्ठ पत्रकार राजेंद्र घरत, कुर्ला भूषण सत्येंद्र सामंत, डॉ महेश अभ्यंकर,संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ वळंजू हे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांनी द्वीप प्रज्वलक करून तसेच योगिता हिरवे यांच्या स्वागत गीताने आणि भूषण मुळे यांच्या शिव गर्जनेने करण्यात आली. प्रास्ताविक जॉयचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले तर सूत्रसंचालन नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील आणि कार्यधाक्षा असूंता डिसोझा यांनी केले.
या अगोदर ही प्रशांत माळवदे यांना समाज सेवक, सोलापूर लायन क्लब आदर्श पत्रकार,सनराईज पब्लिक स्कूलचा सनराइज पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार अभिजित पाटील,सांगोलाचे आमदार बाबासाहेब, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे,चेअरमन कल्याणराव काळे,भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, प्रणव परिचारक, शिंपी समाज क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे,गणेश उंडाळे,भगवान चौगुले, हरिभाऊ शिंदे,सुनील पाटील,विजय शिंदे,सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे,सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे,शिक्षक रामचंद्र सावंत यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
ज्ञानेश्वरी जाधव हिचे जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा यश
ज्ञानेश्वरी जाधव हिचे जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा यश
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली लक्ष्मण (तात्या) धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी निवड