खेलो इंडिया युथ गेम्स, पाटणा येते होणाऱ्या स्पर्धेसाठी अथलेटिक्स पंच म्हणून चेतन धनवडे यांची निवड!
पंढरपूर: प्रतिनिधी
अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव व पंढरपूर अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव चेतन धनवडे यांची खेलो इंडिया युथ गेम्स, पाटणा २०२५ साठी अथलेटिक्स पंच म्हणून निवड झाली आहे. ही संपूर्ण क्रीडा क्षेत्रासाठी गौरवाची बाब आहे. या निवडीबद्दल अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमीचे मा.आ. प्रशांतराव परिचारक मालक, महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य,कार्याध्यक्ष प्रा. सुभाष मस्के सर तसेच सोलापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा. राजू प्याटी सर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.चेतन धनवडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात केलेले प्रामाणिक योगदान, सातत्यपूर्ण मेहनत आणि अथलेटिक्समधील सखोल अभ्यास यामुळे महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्यातर्फे त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व क्रीडा प्रेमींना, संघटनांना आणि मार्गदर्शकांना धन्यवाद दिले व आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचा विश्वास दिला.
More Stories
पंढरपूर अर्बन बँक नवराष्ट्र सहकार पुरस्काराने सन्मानित…सहकार मंत्री मा. नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान…
माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
सिल्व्हरओक शाळेचे मोहोळ तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…..