September 8, 2024

ppr

सिद्धेवाडी जाधव-नागणेवस्ती शाळेत सैनिकांच्या विधवा पत्नींच्या हस्ते ध्वजारोहण व शाळेच्या खोलीचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी
सिद्धेवाडी ता. पंढरपूर येथील जि.प. प्राथमिक शाळा जाधव-नागणेवस्ती येथे सेवानिवृत्त माजी सैनिक यांच्या विधवा पत्नींच्या हस्ते ध्वजपुजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. श्रीम. सिंधुबाई चंद्रकांत ननवरे आणि श्रीम. मंगल सिद्धेश्वर जाधव यांना हा बहुमान आज देण्यात आला. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सैनिक, माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा पत्नींचा सन्मान शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला. दि. 14 ऑगस्ट रोजी गावातील अनिल शरद जाधव या विद्यमान सैनिकांचा सन्मान करण्यात आला. शाळेची तातडीची गरज लक्षात घेऊन त्यांनी 13600 रुपये किमतीचा सुसज्ज असा साऊंड सिस्टीम शाळेला भेट म्हणून दिला. त्यांच्या या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांचे वडील शरद जगन्नाथ जाधव यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वसंतनाना देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
आजरोजी शाळेत ध्वजारोहण आणि नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या सत्रात ध्वजारोहण, ध्वजगीत, राष्ट्रगीत, कवायत, विद्यार्थ्यांची भाषणे, बक्षीस वितरण आणि खाऊवाटप असे कार्यक्रम घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात जि.प. च्या सन 2020- 21 मधील विकास निधीतून बांधण्यात आलेल्या नवीन वर्गखोलीचे उद्घाटन मा. जि.प. सदस्य वसंतनाना देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्र. गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब, सरपंच सौ. रोहिणी सारंग जाधव, विस्तार अधिकारी अनंत शिंदे, विठ्ठलचे संचालक दशरथआबा जाधव, सारंग जाधव, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर यशवंत गडदे,सुरेश गोडसे, आप्पा जाधव,रमेश बनसोडे, प्रकाश जाधव मेंबर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप ननवरे, उपाध्यक्षा सौ. सुप्रिया धुरुपे, महानंदा आसबे, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रदीपक भालेकर, दगडू सावंतराव, मा. सरपंच आण्णा जाधव, तुकाराम दशरथ जाधव, पत्रकार तानाजी जाधव, कुमार कुरे, लक्ष्मण नागणे, निवृत्ती नागणे, रामेश्वर जाधव, अजित जाधव, शरद जगन्नाथ जाधव, मुख्याध्यापक अनिल कांबळे, बाबासाहेब दराडे, नागनाथ क्षीरसागर, संभाजी कुरे, सुनील घुले, सतीश पाटील,महादेव सातपुते, मजनू इनामदार, आण्णा माने, भारत जाधव, महादेव जाधव, तानाजी जाधव, कळकुंबे आणि सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकात धनाजी जाधव सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला. मनोगतात मुख्याध्यापक एम. बी. जाधव यांनी शाळेच्या वर्ग खोली बांधकामासाठी सहकार्य केलेल्या सर्व जि.प., पंचायत समिती अधिकारी, पदाधिकारी, इंजिनियर , ग्रामपंचायत आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे आभार मानले. विद्यार्थी संख्या जास्त असुनही स्वच्छतागृहा अभावी त्रास सहन करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. सरपंच सौ. रोहिणी सारंग जाधव यांनी शाळेच्या प्रत्येक प्रगतीसाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल असे आश्वासन दिले. गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब यांनी नावारूपास आलेल्या, प्रसिद्ध झालेल्या आदर्श वाटणाऱ्या या शाळेचा अभिमान वाटतो अशी भावना व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात आदरणीय वसंतनाना देशमुख यांनी धनाजी जाधव, एम बी जाधव आणि तेजस्विनी कांबळे मॅडम यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. स्वतःच्या घराच्या बांधकामापेक्षाही चांगले बांधकाम एका वर्गखोलीचे झाल्याचे पाहून त्यांनी जि.प. चे हे बांधकाम एक आदर्शच असल्याचे मत व्यक्त केले. ज्या ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे; त्यांनी या शाळेला भेट देऊन शासकीय बांधकाम कसे करून घ्यावे; याचे अवलोकन करावे असे त्यांनी सांगितले. आलेल्या सर्वांचे स्वागत एम. बी. जाधव यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन धनाजी जाधव सर यांनी केले तर सदर कार्यक्रमावेळी उत्कृष्ठ अशी रांगोळी, फलकलेखन व सजावट तेजस्विनी कांबळे-घोडके मॅडम आणि सुप्रिया धुरुपे यांनी केली होती.