December 4, 2025

ppr

मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर (मल्लेवाडी) येथे जुगार अड्ड्यावर छापा, ९७ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

मंगळवेढा – प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर ( मल्लेवाडी ) येथील मारुती मंदिराच्या बाजूस आडोशाला बसून जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ९७ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कुमार ज्ञानेश्वर रायभान (वय ५२), संभाजी विठ्ठल गोडसे (वय ४९), राहुल विलास मस्के (वय ४०), सर्जेराव गुलाब मस्के (वय ६०, सर्व रा.मल्लेवाडी) या चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.मल्लेवाडी येथील मारुती मंदिराच्या बाजूला आडोशाला गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार काही इसम खेळत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला असता, वरील चौघे आरोपी गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.

You may have missed