प्रतिनिधी :- पंढरपूर
वीर भाटगर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असून त्या लाभक्षेत्रातील 9 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी बोलताना दिली
रब्बी हंगाम २०२३-२४ मधील खडकवासला, पवना,भामा, आसखेड, चासकमान प्रकल्प तसेच नीरा उजवा व डावा कालवा प्रकल्प सल्लागार समिती सदस्यांची व सिंचन पाण्याचे नियोजन या सदर संदर्भात विचारविनिमय बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषद माजी सभापती श्री.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व शासकीय व अशासकीय सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये निरा भाटघरचे पाणी वितरिका क्रमांक ७ मधून उंबरगाव-बोहाळी-कोर्टी या ओढ्याला पाणी सोडण्यात यावे जेणेकरून जवळच्या गावातील पाणी पुरवठा होत असणाऱ्या विहीरीस पाणी वाढून पिण्यास पाणी उपलब्ध होईल व रांझणी येथील पाझर तलाव भरून घेणे गरजेचे आहे .टेल टू हेड प्रमाणे तसेच D3मधून पाणी वितरीत करावे व सध्या तिसंगी तलावातील पाणी संपले असून लाभक्षेत्रातील गावांना पिण्याची पाण्याची टंचाई जाणवत आहे लोकांची ही अडचण जाणून घेऊन आ आवताडे यांनी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे समितीच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे माझ्या विविध पाणी मागण्यांची कालवा समितीने दखल घेऊन व सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या १० नोव्हेंबर पासून पाणी देणेची कार्यवाही सुरू करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.
या बैठकीसाठी माजी मंत्री आ.दत्तात्रय भरणे,हर्षवर्धन पाटील, आ.शहाजीबापू पाटील, आ.राम सातपुते,धैर्यशील मोहिते पाटील आ. रविंद्र धंगेकर, माजी आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील आदी मान्यवर व विविध शासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते
तिसंगी तलाव भरून घेणार -आ समाधान आवताडे 10 नोव्हेंबर ला आवर्तन सुटणार

More Stories
ज्ञानेश्वरी जाधव हिचे जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा यश
ज्ञानेश्वरी जाधव हिचे जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा यश
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली लक्ष्मण (तात्या) धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी निवड