July 27, 2024

ppr

नदीकाठच्या गावांना सहा तास वीज मिळणार…!जिल्हाधिकाऱ्यांकडून आमदार आवताडेंची मागणी मान्य

Spread the love

प्रतिनिधी -: पंढरपूर
दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी ही धावा धाव करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र त्या नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तासच सुरू असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही अनेक शेतकऱ्यांच्या पाच ते दहा किलोमीटर अंतर पाईपलाईन आहेत दोन तासांमध्ये त्या पाईपलाईन मधून पाणीही बाहेर पडेनासे झाले आहे त्यामुळे रोज दोन तास वीज पुरवठा सोडण्याऐवजी किमान एक दिवसाआड आठ तास तरी वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती, त्यांचबरोबर दूरध्वनी वरून चर्चा करून चर्चेअंती मार्ग काढत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दररोज सहा तास वीज पुरवठा सुरू करण्याचे मान्य करत तशा सूचना महावितरण विभागास दिल्या असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना असे म्हटले होते की उन्हाची दाहकता वाढत असून नागरिक व जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत प्रशासनाने काही भागात दोन तास तर काही भागात चार तास विद्युत पुरवठा चालू ठेवलेला आहे मात्र या दोन व चार तासाच्या कालावधीमध्ये पुरेसा विद्युत प्रवाह उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी माझ्याकडे दोन व चार तासाऐवजी सलग आठ तास विद्युत पुरवठा द्यावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी करत आहेत महावितरण विभागाकडून सुरू असलेल्या दोन व चार तास विद्युत पुरवठा ऐवजी एक दिवस सलग आठ तास विद्युत पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा त्रास कमी होऊन त्यांना दैनंदिन कामाचे नियोजन करता येईल तरी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना एक दिवसाआड सलग आठ तास विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण विभागास आदेश देण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले होते त्याचबरोबर वारंवार दूरध्वनी वरूनही चर्चा केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी दररोज सहा तास वीज पुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना महावितरण विभागास दिल्या असल्याचे आमदार आवताडे यांनी बोलताना सांगितले