April 13, 2024

ppr

श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेत पर्यावरण पूरक होळी साजरी

Spread the love

पंढरपूर :- प्रतिनिधी

श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका मा. सौ सुनेत्राताई पवार सो.यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर शाळेत पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. मुलांनी शालेय परिसरातील केरकचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला व त्या कचऱ्यापासून पर्यावरण पूरक होळी केली. पाणी बचतीचे, पर्यावरण रक्षणाच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी होळीस फेऱ्या घेतल्या.इयत्ता ४थी चे विध्यार्थी चि. आयन, अर्णव, श्लोक,आरोही व तेजस्विनी यांनी पाणी बचतीचे व पर्यावरणाची रक्षणाची माहिती सांगून पर्यावरण रक्षण व पाणी बचतीची शपथ दिली. होळीचे पूजन मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर यांनी केले. या पर्यावरण पूरक होळीसाठी सौ.कदम मॅडम,यादव मॅडम व टापरे सर आगावणे सर साळुंखे सर, मुजावर सर व महेश भोसले सर यांनी परिश्रम घेतले.