November 13, 2025

ppr

टेक टॉक २०२२’ या संमेलनात स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर- टाटा टेक्नॉलॉजी, पुणे आणि मराठवाडा एक्सलेटर फॉर ग्रोथ अँड इंक्युबेशन कौन्सिल (मॅजिक), औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल बालाजी सरोवर, सोलापूर येथे २२ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केलेल्या ‘टेक टॉक २०२२ ’या एकदिवसीय संमेलनात स्वेरीमधील १८ विद्यार्थी व तीन प्राध्यापक उपस्थित राहिले होते. टाटा टेक्नॉलॉजीज्, पुणे येथील प्रोग्राम लीड (सीएसआर)चे प्रमुख सिद्धार्थ यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेडी इंजिनिअर प्रोग्रॅम’ हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असतो.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘टेक टॉक २०२२ ’या संमेलनात स्वेरीतील १८ विद्यार्थी व तीन प्राध्यापक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नवउद्योजकता घडविण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिरात भविष्यातील नवउद्योजकतेच्या तसेच नोकरीच्या संधी, नाविन्यपूर्ण विचार, इंडस्ट्री 4.0 या आणि इतर विविध विषयांवर कमिन्स कंपनीचे तांत्रिक प्रकल्प अधिकारी तुषार कणिकडाळे, नियो फार्म टेक प्रायव्हेट लिमिटेड चे उद्योजक योगेश गावंडे आणि किर्लोस्कर कंपनीचे अधिष्ठाता दिग्विजय सिंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. मराठवाडा एक्सलेटर फॉर ग्रोथ अँड इंक्युबेशन कौन्सिल (मॅजिक), औरंगाबादचे संचालक आशिष गरडे यांच्या माध्यमातून नवउद्योजकांना उद्योग क्षेत्रात येणाऱ्या अडचणी तसेच त्यांना लागणारे सर्व मार्गदर्शन इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. ‘डिझाईन थिंकिंग’ या विषयावर प्रात्यक्षिक करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना समूहामध्ये कार्य करण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी सोल्युशन डेव्हलपमेंट करण्यासाठी देखील सांगितले होते. ‘रेडी इंजिनिअर’ हा टाटा टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) इनिशिएटिव्ह आहे. या कार्यामध्ये स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी समस्यांचे निराकरण करण्यासाठी असलेले सोल्युशन्स सर्वांसमोर यशस्वीरित्या सादर केले. यामध्ये स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अभिजीत मधुकर बाबर, सूरज पांडुरंग गायकवाड, प्रसाद रामचंद्र शेळके, श्रीहरी सोमनाथ चव्हाण, रविराज मधुकर रोंगे, स्वप्नील देविदास लामकाने, आसावरी धनंजय जाधव,अश्विनी संजय बोडखे, मयुरी बलभीम अभंगराव, मेघा आप्पासो बुरुंगले, वेदांत दिपक जाधव, शुभम शशिकांत गवळी, पवन राजेंद्र शिंदे, प्रीतम गिरमल बुगडे, राहुल भाऊसाहेब सलगरे, वैभव गौरीशंकर तोळनुरे, दत्तात्रय लक्ष्मण पांगळे व अभिषेक मच्छिंद्र जाधव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी महाविद्यालयाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये ‘रेडी इंजिनिअर’ या प्रोग्रामचे समन्वयक प्रा.चेतन जाधव, प्रा.दिगंबर काशीद, प्रा. कुलदीप पुकाळे यांच्या सोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.

You may have missed