July 27, 2024

ppr

कर्मयोगी अभियांत्रिकी च्या प्राध्यापकांना पुरस्कार.

Spread the love

प्रा. धनंजय शिवपुजे व प्रा. मोहसीन शेख पुरस्काराने सन्मानित.

पंढरपूर प्रतिनिधी

प्रा. धनंजय शिवपुजे व प्रा. मोहसीन शेख पुरस्काराने सन्मानित.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. धनंजय शिवपुजे व प्रा. मोहसीन शेख यांना महाप्रशिक्षण आणि रोजगार अधिकारी संघटना यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले.
दि. २२ डिसेंबर रोजी सोलापूर येथील बालाजी सरोवर येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
प्रा. धनंजय शिवपूजे यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “शिक्षा गौरव पुरस्कार 2022” प्रदान करण्यात आला. प्रा. शिवपुजे हे कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहतात.
तसेच कर्मयोगी अभियांत्रिकीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले.

या यशा बद्दल संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक, प्राचार्य डॉ एस.पी.पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ ए. बी कणसे, रजिस्ट्रार श्री जी.डी. वाळके, उपप्राचार्य प्रा जगदिश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशिष जोशी, विभागप्रमुख प्रा राहुल पांचाळ, प्रा अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, तसेच सर्व प्राध्यापकांनी प्रा. शिवपूजे व प्रा. शेख यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.