September 9, 2024

ppr

खेड-भोसे येथील ते अतिक्रमण काढण्यासाठी अखेर पोलीस बंदोबस्त मंजूर

Spread the love

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथिल गट नं २४३/१/ब या ठिकाणावरील सन१९९९ पासून वहिवाट असलेला व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ प्रमाणे हा रस्ता आहे परंतु येथिल महादेव रामचंद्र पवार, रंजना रामचंद्र पवार, नंदकुमार रामचंद्र पवार रामचंद्र ज्ञानोबा पवार हे जाणीवपूर्वक या रस्त्यावर पाणी सोडून खड्डे तयार करून अडथळा निर्माण करत आहेत व त्यांनी या रस्त्यावर पूर्णता अतिक्रमण केले आहे ते काढूण मिळावे या मागणीसाठी लक्ष्मण आबा पवार हे पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणास बसले होते त्यानंतर त्यांना प्रशासने त्यांच्या मागणीची दखल घेत पुढील कारवाई केली जाईल असा विश्वास देण्यात आला व लक्ष्मण पवार यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे तर सदर गट नंबर रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढल जाणार आहे व त्यास प्रशासनाने पोलीस बंदोबस्त मंजूर केला असल्याची माहिती लक्ष्मण आबा पवार यांनी दिले आहे