November 21, 2024

ppr

“७४ वा प्रजासत्ताक दिन कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे उत्साहात संपन्न”

Spread the love



पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेमध्ये आज ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ध्वजवंदनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पंढरपूर अर्बन बँकेच्या चेअरपर्सन सौ. माधुरीताई जोशी या उपस्थित होत्या. त्याचबरोबर प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई व माजी नगरसेवक श्री. तुकाराम राऊत तसेच संस्थेचे रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके सर हे उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन सादर करत राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर प्रशालेतील इयत्ता १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्राविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेमधून सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे मनोगत सादर केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या सौ. माधुरी ताई यांनी सर्व विद्यार्थ्याना मोबाईल चा अजिबात वापर न करण्याचे आवाहन केले. त्यावर सर्व विद्यार्थ्यांनी हात उंचावून त्यांना मोबाईल न वापरण्याचे वचन दिले.
यानंतर प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी प्रशालेचे विद्यार्थी इंग्रजी विषयांमधून संभाषण करत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण पंढरपूरचे लक्ष लागून असलेले वार्षिक स्नेहसंमेलन पाहण्यासाठी प्रमुख पाहुण्यांना पुनश्च एकदा निमंत्रण दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गिरीश खिस्ते यांनी केले, तर आभार हिंदी शिक्षिका सौ. सारिका बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.